मोहोळ: डांबून ठेवलेल्या ऊस तोडणी मजुरांची सुटका

राजकूमार शहा 
रविवार, 30 डिसेंबर 2018

सर्व मजुरांना मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. कारखाना, वाहन मालक यांची बाजु ऐकुन घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
- सूर्यकांत कोकणे ( पोलिस निरीक्षक )
 

मोहोळ : भिमा कारखाना परिसरात पैशासाठी ऊस तोडणी मजुरांना डांबुन ठेवल्याच्या तक्रारीवरुन मोहोळ पोलिसांनी त्यांची सुटका केली व त्यांना त्यांच्या गावी पाठविल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान मजुरांना डांबुन न ठेवल्याची माहिती भिमा कारखान्याचे शेती आधिकारी माणिक पाटील यांनी दिली.

या संदर्भात मोहोळ पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसाऱ मध्य प्रदेशातील धामनिया ता. वरली गावातील सुमारे त्रेपन मजुरांना टाकळी सिकंदर येथे पैशाचे आमिष दाखवुन ऊस तोडणीसाठी आणले व काम येत नाही म्हणुन त्यांना डांबुन ठेवले आहे, अशा प्रकारचा रिपोर्ट मध्यप्रदेश पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिताराम भटनागर व हवालदार राजेश नायर यांनी मोहोळ पोलिसात दिला व मदत मागितली. दरम्यान पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस पथक मदतीला दिले.

मध्य प्रदेश पोलिस व मोहोळ पोलिस टाकळी सिकंदर परिसरात गेले असता खंडुजी शिवाजी डुणे व सुधाकर चiगदेव माने रा. सौंदणे यांनी वरील मजुरांना ऊस तोडणीसाठी आणले होते .परंतु त्यांना काम होत नसल्याने त्यांनी बारा डिसेंबर पासुन काम करणे बंद केले होते. काम करणार नसाल तर आमचे पैसे द्या व मग तुमच्या गावाकडे जा, अशी भुमिका व भिती वरील दोन्ही ट्रॅक्टर मालकांनी घातली. ऊस तोडणीसाठी म्हणुन सदर मजुरांना ट्रॅक्टर मालकाने सहा लाख चोपन हजार रुपये दिले आहेत. मोहोळ व मध्य प्रदेश पोलिसांनी सर्व मजुराना पोलिस ठाण्यात आणले व त्यांचे जाब जबाब घेऊन मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले.

सर्व मजुरांना मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. कारखाना, वाहन मालक यांची बाजु ऐकुन घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
- सूर्यकांत कोकणे ( पोलिस निरीक्षक )

मजुरांना डांबुन ठेवले नव्हते, ते सौंदणे येथे ऊस तोडताना मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांना आणले आहे, त्यांच्या ऊस तोडणीची स्लीप आहे.
- माणिक पाटील ( शेती अधिकारी  भिमा कारखाना )

Web Title: sugarcane labours recused in Mohol