पुरग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मांजरी - पुरग्रस्तांना न्याय मिळावा यामागणीसाठी एका पुरग्रस्ताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रवींद्र गुणके असे त्याचे नाव आहे. 

मांजरी - पुरग्रस्तांना न्याय मिळावा यामागणीसाठी एका पुरग्रस्ताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रवींद्र गुणके असे त्याचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात जुगूळ ( ता. कागवाड , जि. बेळगाव) येथील पूरग्रस्तांचे मोठे नुकसान झाले. जुगुळ ग्रामपंचायत व तालुका व जिल्हा प्रशासनातर्फे पूरग्रस्तांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. पण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले. पण पुरग्रस्तांना योग्य न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीने योग्य ती दखल घ्यावी, या मागणीसाठी रवींद्र याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला अधिक उपचारासाठी मिरजेतील रूग्णालयात दाखल केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A suicide attempt to get justice for the afflicted