गॅस सिलिंडर, दुचाकीची आत्महत्या; महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन

suicide of Gas cylinder, two-wheeler; Unique movement to protest against inflation
suicide of Gas cylinder, two-wheeler; Unique movement to protest against inflation

सांगली : वाढत्या महागाईला जबाबदार केंद्र सरकारच्या विरोधात मदनभाऊ पाटील युवा मंचने आज कॉंग्रेस भवनसमोर अनोखे आंदोलन केले. गॅस सिलिंडर व दुचाकी या प्रतिकात्मक भाऊ-बहिणीने आत्महत्या केल्याचे भासवत लटकत ठेवले. तसेच दुखवटा म्हणून 13 वा दिवस न पाळता आत्महत्येच्या दिवशीच सर्व कार्य उरकून कार्यकर्त्यांनी शिरा, भात, आमटी, भाजीचे जेवण केले. या अनोख्या आंदोलनाची आज सर्वत्र चर्चा रंगली. 

केंद्रातील मोदी सरकार महागाई कमी करतो, असे सांगून सत्तेवर आले. महागाई कमी होण्याऐवजी गगनाला भिडली आहे. जनतेच्या अन्नात माती कालवायचे काम सरकारकडून होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या मूळ किमती कमी झालेल्या नाहीत. डिझेल वाढल्यामुळे सर्वच क्षेत्रात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दैनंदिन गरजेच्या गोष्टी महाग झाल्या आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचा बडेजाव करणाऱ्या भाजप सरकारला सामान्याला 830 रुपये गॅस परवडणारा नाही याचेही भान राहिले नाही. 

रॉकेलही बंद केल्यामुळे खेड्यापाड्यात तसेच आदिवासी भागात लोकांनी गॅस सिलिंडरशी काडीमोड घेऊन चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. जनतेसाठी स्वस्त योजना आणून, त्याची सवय लावून, नंतर भरमसाट पैसे उकळण्याचा धंदा भाजप सरकारने केला आहे. जनसेवक, चौकीदार नसून व्यापारी व चोर वृत्तीचे भाजप सरकार आहे. महागाई कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा अन्यथा मदनभाऊ युवा मंच रास्ता रोकोसारखे उग्र आंदोलन करेल, असा इशारा दिला. 

युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, शीतल लोंढे, शेखर पाटील, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, मयूर बांगर, तौफीक बिडीवाले, राम कुट्टे, दिनेश सादीगले, जुनेद महात, प्रथमेश भंडे, सुजित लकडे, नितीन भगत, प्रवीण निकम, महेश कर्णे, जयराज बर्गे, अमर निंबाळकर, चिंटू पवार, अक्षय दौडमणी, महेश पाटील, नेमिनाथ पाटील, अनुप असावा, शानुर शेख, शरद गाडे, संतोष कुरणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com