मिरजेतील शासकीय कोरोना रुग्णालयात रुग्णाची गळा चिरून आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

या आत्महत्येबाबत रुग्ण मोमीन याच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. तथापि रुग्णालय व्यवस्थापनाने मात्र संबंधित रुग्ण कोरोनातून पूर्ण मुक्त झाले होते परंतु त्यांनी आत्महत्या का केली याबाबत आम्हास आपणास काही माहिती नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले.

मिरज (सांगली) :  शहरातील शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या हुसेन बाबुमिया मोमीन (वय 55) या रुग्णाने रुग्णालयात गळा चिरून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच घबराट पसरली. या आत्महत्येबाबत रुग्ण मोमीन याच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. तथापि रुग्णालय व्यवस्थापनाने मात्र संबंधित रुग्ण कोरोनातून पूर्ण मुक्त झाले होते परंतु त्यांनी आत्महत्या का केली याबाबत आम्हास आपणास काही माहिती नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. 

मिरज मालगाव रस्त्यावरील अमननगर वसाहतीमध्ये रहणारे हुसेन मोमीन हे गेल्या दहा दिवसांपासून मिरज शासकीय रुग्णालयात वार्ड क्रमांक 68 मध्ये अतिदक्षता विभागात कोरोना वरील उपचारांसाठी दाखल झाले होते. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार करून केल्यामुळे ते कोरोना रोगातून मुक्तही झाले. त्यांना दोन दिवसात रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. रविवारी (ता. 27) सायंकाळी हुसेन मोमीन यांनी त्यांच्या मुलाशी फोनवरून चर्चा केली आणि रात्री अकरा वाजल्यानंतर त्यांनी स्वतःकडील फळे कापायच्या चाकूने गळा चिरून घेऊन आत्महत्या केली. 

या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच गोंधळ माजला. दरम्यान या आत्महत्येबाबत हुसेन मोमिन यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. उपचारातुन पूर्ण बरे झालेले हुसेन मोमीन हे आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत का आले? याची सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांची मागणी आहे याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by slitting the throat of a patient at the Government Corona Hospital in Miraj