संगमनेरात तबलीगच्या 14 जणांना मशिद, घरात दिला पनाह

Support fourteen of the Tablighs at Sangamner
Support fourteen of the Tablighs at Sangamner

संगमनेर ः संगमनेर शहर व तालुक्यात चार जण कोरोनाबाधीत असल्याचे उघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील एका मस्जिदीत नेपाळसह परराज्यातील 14 जणांना गुरुवार ( ता. 26 ) मार्च रोजी आसरा दिल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

या प्रकरणी या नागरिकांच्या जेवण्या राहण्याची व्यवस्था करणाऱ्या तबलिग समाजाचे मर्कज मस्जिद मोमिनपुराचे ट्रस्टी असलेल्या पाच जणांविरुध्द काल रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हाजी जलीमखान कासमखान पठाण, हाजी शेख जियाऊद्दीन आमीन, जैनुद्दीन हुसेन परावे, हाजी इमाम जैनुद्दिन मोमीन, रिजवान गुलामनबी मोमिन ( सर्व रा. मोमीनपुरा, संगमनेर ) अशी त्यांची नावे आहेत.   

शहराच्या नगररोड परिसरातील नाटकी नाल्याजवळील इस्लामपुरा मस्जिदीत नेपाळ येथील परदेशी नागरिकांसह परराज्यातील एकून 14 तबलिग जमातीच्या नागरिकांना गुरुवार ( ता. 26 ) मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास आसरा देण्यात आला होता. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाची नजर चुकवून या 14 जणांना मस्जिद व रहेमतनगर गल्ली क्रमांक 2 येथील घरात आसरा देण्यात आल्याची बाब 31 मार्च रोजी घेतलेल्या बैठकीत पोलिस निरिक्षक अभय परमार यांना समजल्याने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार ( ता.1 ) रोजी गोपनिय शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पहाणीत रहेमतनगरच्या गल्ली क्रमांक 2 ,डोंगरे मळा परिसरातील  अमजद इब्राहिम शेख यांच्या तिसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये 14 नागरिक अनधिकृतरित्या वास्तव्यास असल्याची बाब उघडकीला आली.

गफारमिया जलिलमिया धुनिया ( 39 ), सराजमिया इस्लाममिया ( 18 ) दोघेही रा. दुहीबी, सुनलरी, नेपाळ, महंमद दाऊदमिया लालमोहंमद ( 55 ), सज्जाक मोहंमद ताहिरमिया ( 18 ) दोघेही रा. कोशी, जि. मोरड, भाथीगंझ नेपाळ, जालमोहंमद ऐनुलमिया ( 25 ), अझरअली मोहंमद असिममिया ( 25 ), सलिममिया हफीजमिया ( 57 ), तिघे रा. धुहवी, जि, सुनसरी, नेपाळ, मोहंमद अझर मोहंमद सनोवर शेख ( 41 ), फिदा हुसेन मिया ईस्लाम ( 26 ), अहमद मन्सुर सुदामामिया ( 41 ) इस्लाम महंमदमिया हनिफमिया ( 56 ) चौघे रा. कोशी जि. सुनसरी, नेपाळ, मोहंमद सुलेमान सखर्शिद आलम ( 24 ), रा. आत्मज खुर्शिद आलम, जटवारा, बिहार अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांची रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ, संदीप कचेरीया यांनी तपासणी करुन होम क्वारंटाईनचे शिक्के मारले आहेत.

या प्रकरणी पोलिस नाईक सलिम रमजान शेख यांच्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिस ठाण्यात शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या नियमाची जाणीवपूर्वक अवज्ञा करुन, कोरोना विषाणू संसर्ग पसरण्यासाठी हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेरवर कोरोनाचे संकट घोंघावत असताना, प्रशासनास माहिती न देता परदेशी नागरिकांना धार्मिक स्थळ व घरात आश्रय का देण्यात आला. याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com