
बारामती : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला याला सुप्रिया सुळे कारणीभूत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, पण पवार कुटुंब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे पाप फडणवीस व भाजपने केले आहे. बारामतीत आज जी स्थिती निर्माण झाली, त्याला पूर्णपणे फडणवीस व भाजपच जबाबदार आहे. सुप्रिया सुळे यांना पुढे केल्याने अजित पवार बाहेर पडले, हे फडणवीस यांचे वक्तव्य बारामतीकरांसाठी सर्वाधिक हास्यास्पद आहे,’’ असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडविली.