esakal | शिराळा तालुक्‍यात आजपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण

बोलून बातमी शोधा

Survey of out-of-school children in Shirala taluka from today}

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडाविभाग यांच्या (ता.23) फेब्रुवारी 2021 च्या पत्रानुसार "बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क' अधिनियम कायद्यांतर्गत 6 ते 14, 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण जिल्ह्यासह शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम- उत्तर भागात सोमवार (ता. 1 ते 10) मार्च अखेर होणार आहे. 

शिराळा तालुक्‍यात आजपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण
sakal_logo
By
हिंम्मतराव नायकवडी

बिळाशी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडाविभाग यांच्या (ता.23) फेब्रुवारी 2021 च्या पत्रानुसार "बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क' अधिनियम कायद्यांतर्गत 6 ते 14, 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण जिल्ह्यासह शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम- उत्तर भागात सोमवार (ता. 1 ते 10) मार्च अखेर होणार आहे. 

शाळाबाह्य असणारी मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही. याची खबरदारी सर्वेक्षणात घेण्यात येणार आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी घ्यावी, असे आवाहन शिराळा येथील पंचायत समितीत पार पडलेल्या सर्वेक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी केले. 

सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने, शिक्षण विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख, विष्णू दळवी, सर्व केंद्रप्रमुख, सुहास रोकडे, धोंडिराम गोसावी, मधुवंती धर्माधिकारी, केंद्रप्रमुख अलिशा मुलाणी, डी. एस. साळे, हरिभाऊ घोडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका जानकर, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी विशाल खुर्द, पर्यायी शिक्षण विषयतज्ज्ञ मधुकर डवरी, नगरपंचायत प्रतिनिधी सुविधा पाटील, बालरक्षक शिक्षक महादेव देसाई उपस्थित होते. 

या भागात होणारे सर्वेक्षण 
गावात ,पालावर, रेल्वेस्थनक, वीटभट्टी, बसस्थानक, ऊसतोड मजूर रहात असणारी सर्व ठिकाणी हे सर्वेक्षण एक मार्च ते दहा मार्च या कालावधीत होणार असून 3 ते 18 वयोगटातील अंगणवाड्यातील मुले तसेच शाळेपासून दूर असणारी,त्यांना अनेक अडचणी निर्माण होणारी मुले यांचा शोध या मोहिमेतून घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार