महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांचा सर्व्हे... मंगळवारपासून मोहीम, आजारांची माहिती गोळा करणार 

बलराज पवार
Sunday, 12 July 2020

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोना वाढत चालल्याने प्रशासनाने आता खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे मंगळवार (ता. 14)पासून करण्यात येईल. यात 50 वर्षांवरील नागरिकांच्या प्रकृतीची माहिती गोळा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोना वाढत चालल्याने प्रशासनाने आता खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे मंगळवार (ता. 14)पासून करण्यात येईल. यात 50 वर्षांवरील नागरिकांच्या प्रकृतीची माहिती गोळा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. शहराच्या विविध भागांत आता कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात चिंता वाढली. प्रशासनासमोर कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मार्चपासून जूनच्या मध्यापर्यंत कोरोनाचा प्रसार मर्यादित होता. मात्र, गेल्या 15 दिवसांत हीच संख्या वेगाने वाढू लागली आहे. ताप, खोकला व घसा दुखणे अशा तक्रारी असलेल्या 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा संसर्ग होऊ शकतो. हे लक्षात घेऊन महापालिकेने आता घर टू घर सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

महापालिका आयुक्त कापडणीस यांनी महापालिकेच्या शिक्षकांच्या माध्यमातून मंगळवारपासून महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांत घरनिहाय सर्वेक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणात प्रामुख्याने 50 वर्षांवरील व्यक्ती व अनेक आजार असणाऱ्या व्यक्ती यांची माहिती घेतली जाईल. आपल्या घरातील व्यक्तींना ताप/खोकला/सर्दी/घसा दुखणे/श्वास घेण्यास अडचण/दम लागणे अशा प्रकारची लक्षणे असल्यास ती लपवू नका. सर्व्हेसाठी येणाऱ्या पथकांनी आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची योग्य माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. 

 

संपादन : घनशाम नवाथे 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey of senior citizens in the municipal area .From Tuesday, the campaign will collect information about diseases