कांग्रेसच्या सुशीलकुमारांना आला घरका भेदी लंका ढायेचा अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांग्रेसच्या सुशीलकुमारांना आला घरका भेदी लंका ढायेचा अनुभव

निवडणुकीत ग्रामीण भागातील मोहोळ आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांमध्ये लक्षणीय मताधिक्क्य मिळाले,  त्याचवेळी भिस्त असलेल्या सोलापूर शहरातील तीन आणि अक्कलकोटमध्ये मात्र पिछाडीवर जावे लागल्याने कांग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना घर का भेदी लंका ढाये याचा अनुभव आला आहे.

कांग्रेसच्या सुशीलकुमारांना आला घरका भेदी लंका ढायेचा अनुभव

सोलापूर -  निवडणुकीत ग्रामीण भागातील मोहोळ आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांमध्ये लक्षणीय मताधिक्क्य मिळाले,  त्याचवेळी भिस्त असलेल्या सोलापूर शहरातील तीन आणि अक्कलकोटमध्ये मात्र पिछाडीवर जावे लागल्याने कांग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना घर का भेदी लंका ढाये याचा अनुभव आला आहे. हीच स्थिती कायम राहिली तर कांग्रेसचे आमदार असलेल्या आणि पिछाडी मिळालेल्या जागांसाठी धोक्याची घंटा आहे. 

श्री. शिंदे यांना 2014 मध्ये एकूण 3 लाख 68 हजार 205 मते मिळाली, यंदा त्यात आणखी 1828 ची घट होऊन हा आकडा 3 लाख 66 हजार 377 पर्यंत पोचला. विशेष म्हणजे मोहोळ आणि पंढरपूरमध्ये गत निवडणुकीच्या तुलनेत अनुक्रमे 11 हजार 959 आणि 17 हजार 832 आणि  पोस्टलचे 693 असे मिळून 30 हजार 414 चे जादा मताधिक्क्य मिळाले. त्याचवेळी शहर उत्तर 14 हजार 563, शहर मध्य 5 हजार 819, दक्षिण सोलापूर 2 हजार 958 आणि  अक्कलकोट 10 हजार 972 असे एकूण 34 हजार 312 मतांनी पिछाडीवर जावे लागले. या चार मतदारसंघाचा मोठा पटका श्री. शिंदे यांना बसला. 

महापालिका क्षेत्रात शहर उत्तर मतदारसंघामध्ये कांग्रेसचा एकही नगरसेवक नाही. दक्षिण सोलापूर आणि शहर मध्यमध्ये मिळून एकूण 14 नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या प्रभागात मताधिक्क्य आवश्यक होते. मात्र तसे झाल्याचे दिसत नाही. या नगरसेवकांचा प्रभाव असलेल्या परिसरातील केंद्रांवर कांग्रेसला आघाडी मिळाली, पण संपूर्ण प्रभागात आघाडी मिळाली  असे चित्र नाही. हीच स्थिती अक्कलकोट मतदारसंघात आहे. श्री. शिंदे यांना अक्कलकोट ग्रामीण भागात काही गावांमध्ये आघाडी मिळाली, उर्वरीत सर्व ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर राहिले. दक्षिण सोलापूरमध्येही हीच स्थिी आहे. एकूणच मोहोळ आणि पंढरपूरने गतनिवडणुकीच्या तुलनेत तब्बल 30 हजारांचे मताधिक्क्य देऊनही, हक्काच्या सोलापूर शहर आणि
अक्कलकोटमध्ये मिळालेल्या पिछाडीमुळे श्री. शिंदे यांना पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली.

सुशीलकुमार शिंदेंना मिळालेल्या मतांचा तुलनात्मक तक्ता
----------------------------------------
मतदारसंघ        2019         2014         फरक
------------------------------------------
मोहोळ          87151        75192       11959 अधीक
शहर उत्तर      33593         48156       14563 कमी
शहर मध्य      49994        55813        5819  कमी
अक्कलकोट     57488          68460       10972 कमी
दक्षिण सोलापूर   50913        53871       2958 कमी
पंढरपूर          84135        66303       17832 अधीक
पोस्टल          1103           410        693 अधिक
-------------------------------------------
एकूण       366377          368205      1828 कमी

Web Title: Sushil Kumar Trailing Solapur City And Akkalkot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top