Loksabha 2019 : 'स्वाभीमानी'च्या सांगली जिल्हाध्यक्षांचा युतीला पाठींबा

शिवाजीराव चाैगुले
गुरुवार, 18 एप्रिल 2019

शिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांनी आपला स्वाभिमानीचा बिल्ला व मनात स्वाभिमान कायम ठेवून बहुजनांचा चेहरा व युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशी घोषणा देशमुख यांनी कोल्हापूर येथे केली. 

शिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांनी आपला स्वाभिमानीचा बिल्ला व मनात स्वाभिमान कायम ठेवून बहुजनांचा चेहरा व युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशी घोषणा देशमुख यांनी कोल्हापूर येथे केली. यावेळी मंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी नेते पाशा पटेल उपस्थित होते. 

श्री. देशमुख म्हणाले, येथील जातीवादाचे राजकारण व अचानक केल्या जाणाऱ्या तडजोडीला कंटाळून हा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी माझ्या सोबत आहे, त्यांनी स्वाभिमानीचा विचार सोडला आहे. ज्या काँग्रेस व राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना लाठ्या व गोळ्या घातल्या. त्यांच्या पंगतीला जाऊन ते बसलेत. बहुजनांच्या पोरांनी लाठ्या काठ्या खाऊन चळवळ वाढवायची. चळवळ वाढली की त्या ठिकाणी ते त्यांच्या जातीची पिल्लावळ तिथे बसवतात. याच तिटकाऱ्यातून ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुजनांच्या पाठीशी बहुजन राहिल्यावर काय होते ते पहायचे आहे. म्हणून मी धैर्यशील माने यांनी जाहीर पाठिंबा देत आहे.

शेट्टींचा निर्णय काय
आज शिराळा येथे सायंकाळी पाच वाजता शेट्टींची जाहीर सभा आहे. देशमुख हे याच मतदार संघातील कोकरूडचे असल्याने त्यांच्याबद्दल शेट्टी काय बोलणार व निर्णय काय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Web Title: Swabhimani District president Vikasrao Deshmukh Support to Alliance