Video : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर सोडल्या कडकनाथ कोंबड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

सांगली - कडकनाथ घोटाळा प्रकरणाची चौकशी करुन आरोपींना तातडीने अटक व शिक्षा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. पलूस ताकारी मार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या सोडल्या.

सांगली - कडकनाथ घोटाळा प्रकरणाची चौकशी करुन आरोपींना तातडीने अटक व शिक्षा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. पलूस ताकारी मार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या सोडल्या.

इस्लामपूर - पलूस मार्गावरील घोगाव फाट्यावर पोलिस बंदोबस्ताचा ससेमिरा चुकवत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भारत चौगुले, भागवत जाधव, बाळासाहेब लिंबीकाळे, संदीप शेळके आदी आंदोलनांनी कोबड्या सोडल्या. कार्यकर्त्यांना यावेळी घोषणाबाजीही केली. विशेष म्हणजे मोठा पोलिस बंदोबस्त, भाजपच्या कार्यकर्त्यांची वावर असतानाही आंदोलकांनी आपले उद्दिष्ट साध्य केले. स्वाभिमानीने कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणाची चौकशी आणि आरोपींना अटक करावी, संपूर्ण कर्जमाफी, पूरग्रस्तांना मदत आदी कारणंसाठी आंदोलन केले. 

कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणी कडकनाथ कोंबडीपालक शेतकरी संघर्ष समितीनेही महाजनादेश यात्रेत कोबड्या सोडण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही आज महाजनादेश यात्रेत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या सोडल्या.

कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असे कडकनाथ कोंबडीपालक शेतकरी संघर्ष समितीने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Farmers organisation agitation before Chief Minister Mahajanadesh Yatra