"स्वाभिमानी'चा एकरकमी एफआरपीसाठी रस्ता रोको; लक्ष्मीफाटा येथे आंदोलन

Swabhimani's road block for one-time FRP; agitation at Islampur- Sangali
Swabhimani's road block for one-time FRP; agitation at Islampur- Sangali

तुंग (जि. सांगली ) : सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली- इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा येथे चक्का जाम करत रस्ता रोको केला. यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळित झाली. 

संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कृषी विधेयकांमुळे देशातील शेतकरी मजूर बनणार आहेत; तर उद्योगपती मालक बनणार आहेत. उद्योगपतींना मोठे करायचे असून, त्यांच्या हातामध्ये शेती जाणार असल्यामुळे या विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व कारखादारांनी एकरकमी एफआरपी द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. 

या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज लक्ष्मी फाटा येथे चक्काजाम करत रस्ता रोको केला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारी बारा वाजता आंदोलन करून, त्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिरी कार्यालयामध्ये अभिजित चौधरी यांची भेट घेत त्यांना या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.

जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी एफआरपीची कोणतीही मोडतोड न करता साखर नियमन कायद्यानुसार एकरकमी एफआरपी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. कायद्यानुसार एकरकमी एफआरपी देणे आवश्‍यक असताना, कारखानदारांनी संगनमताने ती तीन टप्प्यांत देण्याचे धोरण स्वीकारले आहे. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलवून हा प्रश्न निकालात काढावा, असेही निवेदनात म्हटले आहे. 

लक्ष्मी फाटा येथे झालेल्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व प्रवक्ते महेश खराडे, युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, भागवत जाधव, महेशकुमार जगताप, वसंत सुतार, मारुती देवकर, जगन्नाथ भोसले, तानाजी साठे, रविकिरण माने, निखिल कारंडे, शीतल पाटील, राहुल कोळी, अभी पाटील, सुमित चव्हाण, प्रताप पाटील, सुरेश वसगडे, बाळासाहेब पाटील आदींसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com