टेलरिंग व्यवसायिकांची गरजांना कात्री :कोरोनामुळे कारागिरांवर मोलमजुरीची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tailoring professionals working on daily wages in others farms due to Corona time

एरव्ही कपड्यावर कात्री चालवणारांना आपल्या दैनंदिन गरजा कमी करण्यासाठी रोजच्या गरजानांच कात्री लावावी लागत असल्याचे चित्र वाळवा तालुक्‍याच्या ग्रामीण भागात टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या कारागीरांच्या हलाखीच्या परीस्थितीवरुन दिसून येत आहे.

टेलरिंग व्यवसायिकांची गरजांना कात्री :कोरोनामुळे कारागिरांवर मोलमजुरीची वेळ

किल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) : कोरोनामुळे शासनाने लग्नसमारंभासाठी पाहुण्यारावळ्यांच्या उपस्थितीस मर्यादा घालून दिल्याने लग्नकार्य साध्या पद्धतीने होवू लागली आहेत. लग्नात मानपान राहिला नाही. नववधूवराच्या पोषाखासह आहेर माहेराची कपडे शिवण्यावर मर्यादा आल्या. नववधुवराचे पोषाखही रेडीमेड घेण्यास पसंती दिली जाऊ लागल्याने त्याचा फटका टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना बसला आहे. नोकरी मिळत नसल्याने शिक्षण घेऊन टेलरिंग व्यवसायाकडे वळलेल्या तरुणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. एरव्ही कपड्यावर कात्री चालवणारांना आपल्या दैनंदिन गरजा कमी करण्यासाठी रोजच्या गरजानांच कात्री लावावी लागत असल्याचे चित्र वाळवा तालुक्‍याच्या ग्रामीण भागात टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या कारागीरांच्या हलाखीच्या परीस्थितीवरुन दिसून येत आहे. 

वाळवा तालुका सधन असल्याने मुलामुलींची लग्ने धडाक्‍यात करण्याकडे पालक वर्गाचा कल असतो. लग्नकार्यात घरच्या मंडळीसह नववधूवर, मेहूणे, मुलामुलींचे मामा, जवळचे नातेवाईकांना नवीन कपडे घेण्याची परंपरा आहे. या परंपरेमुळे ग्रामीण भागातील शिवणकाम करणाऱ्या कारागिरांचा उदरनिर्वाह चालतो. तथापि चालूवर्षी कोरोनाचे संकट आले आणि लग्नकार्यासाठी पन्नास लोकांपेक्षा जादा व्यक्तींच्या उपस्थितीवर मर्यादा आल्याने पैपाहूण्यांची उपस्थिती कमी झाली. आहेराचे प्रमाणाच राहिले नसल्यामुळे शिवणावळीची कामे बंद झाली. तसेच लॉकडाऊनच्या काळातील सततच्या बंदमुळे नियमित व्यवसायावर परिणाम होऊन कामेही घटली. त्यामुळे टेलरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. ज्या कारांगीरांकडे थोडीफार जमीन आहे, त्यांचे हात आता स्वत:च्या शेतात राबताना दिसत आहेत. मात्र ज्यांच्राकडे जमीन नाही त्यांना उदरनिर्वाहासाठी मोलमजुरीच्या कामावर जाण्याची वेळ आली आहे. 

कोरोनाचे संकट टळल्याशिवाय लग्नकार्ये हौसेने होणार नाहीत. तोपर्यंत कारागीरांनाही कामेही मिळणार नाही. तालुक्‍यातील ताकारीसह भवानीनगर येथील व्यापार पेठेबरोबर रेठरेहरणाक्ष, शिरटे, येडेमच्छिंद्र, नरसिंहपूर तसेच किल्लेमच्छिंद्रगड येथील व्यापारी वसाहत असलेल्या शिवनगरमध्ये शिवणकाम करणाऱ्या शेकडो कारागीरांची जगण्यासाठी इतर कामे करावी लागणार आहेत. 

टेलरिंगचा व्यवसायही अडचणीत
कोरोनामुळे लग्नात नववधू-वरास तसेच आहेराची कपडे घेवून शिवणे बहुतांश बंद झाले आहे. रेडीमेड कपड्याने वेळ मारुन नेली जातेय. त्यामुळे कापड व्यवसायबरोबर टेलरिंगचा व्यवसायही अडचणीत आला आहे. 
- भुपेश डुबल, कापड दुकानदार, किल्लेमच्छिंद्रगड (शिवनगर) 

संपादन : युवराज यादव

Web Title: Tailoring Professionals Working Daily Wages Others Farms Due Corona Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sangli
go to top