पैसे घ्या, पण जेवन चांगलं द्या, कोरोना रुग्णांची आर्त हाक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

शासकीय रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी येथील भोजन व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. हवं तर पैसे घ्या, पण जेवन चांगले द्या, अशी मागणीही काही लोकांनी केली आहे. खुद्द जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लक्ष घातल्यानंतरही येथील जेवनाचा दर्जा सुधारत नसेल तर काय करायचे, असा चिंताजनक सवाल व्यक्त केला जात आहे. 

 सांगली ः शासकीय रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी येथील भोजन व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. हवं तर पैसे घ्या, पण जेवन चांगले द्या, अशी मागणीही काही लोकांनी केली आहे. खुद्द जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लक्ष घातल्यानंतरही येथील जेवनाचा दर्जा सुधारत नसेल तर काय करायचे, असा चिंताजनक सवाल व्यक्त केला जात आहे. 

कोरोना बाधित रुग्णांवर मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहे. काही महाविद्यालयांसह वसतगृहांमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. ही व्यवस्था संपूर्ण मोफत आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून त्याचे लाभ दिले जात आहेत. यापैकी विलगीकरण कक्षातील भोजन व्यवस्थेबाबत रुग्ण समाधानी आहेत. परंतू, शासकीय रुग्णालयातील भोजन व्यवस्थेबाबत मात्र रुग्ण नाराज आहेत. चपाती तुटत नाही, ती पूर्ण भाजलेली नसते, वरणाची भाजी अगदीच बेचव असते, अशा साधारण तक्रारी आहेत. या रुग्णांना औषधोपचाराबरोबरच सकस आहार आणि विश्रांती खूप महत्वाची असते. अशावेळी सकस आहार नसेल तर विश्रांती तरी कसी मिळणार? 

याबाबत काही रुग्णांशी "सकाळ'ने संवाद साधला. त्यातील एका महिलेने सांगितले, ""मला काही दिवस एकच चपाती दिली गेली. मी मागून दोन घेतल्या. एका चपातीने पोट भरत नाही.'' 
ग्रामीण भागातील एका शासकीय नोकरदाराने सांगितले, ""अनेकदा दुसरी चपाती मागितली तर मिळत नव्हती. त्याबाबत तक्रार करावी लागली. मी पैलवानकी केली आहे, भूक मारून कशी चालणार? विलगीकरण विभागात मात्र जेवन चांगले मिळाले.'' 

वसंतदादा शासकीय रुग्णालयातील कित्येक रुग्णांनी तर खासगी डबा लावला आहे. त्यांचे नातेवाईक बाहेर पार्सल ठेवून जातात. रुग्णांनी विनंती केलीय, की फक्त जेवनाचा दर्जा चांगला ठेवला पाहिजे. बाकी सुविधा उत्तम आहेत, डॉक्‍टर काळजी घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take the money, but give the food good, call the corona patients