esakal | गायीचे संगोपन म्हणजे 33 कोटी देवांची पूजा : विजयकुमार देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

गायीचे संगोपन म्हणजे 33 कोटी देवांची पूजा : विजयकुमार देशमुख

गायीचे संगोपन करणे म्हणजे 33 कोटी देवांची पूजा केल्यासारखे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. 

गायीचे संगोपन म्हणजे 33 कोटी देवांची पूजा : विजयकुमार देशमुख

sakal_logo
By
सुस्मीता वडतीले

सोलापूर : गायीचे संगोपन करणे म्हणजे 33 कोटी देवांची पूजा केल्यासारखे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. सेवावर्धिनीच्या वतीने येथे भटक्‍या विमुक्त जाती जमातीचे उपजीविकेच्या साधनाद्वारे सक्षमीकरण व संवर्धन यासाठी सोलापूर व उस्मानाबाद  जिल्ह्यातील पारधी समाजातील लाभार्थ्यांना 11 गायीचे वाटप झाले. यावेळी पालकमंत्री बोलत होते.

खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, आपल्या कुटुंबाची उन्नती व्हावी व आपला समाज पुढे जावा म्हणून गायीचे चांगली जोपासना केली पाहिजे. प्रत्येकाने आपला देश, आपला समाज, आपले कुंटुंब पुढे कसे नेता येईल, याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

महास्वामी म्हणाले, प्रत्येक गाय ही देवता आहे, गायीमध्ये वास्तरुप आहे. गायींचे सेवा करणे म्हणजे एकमेंका सहाय्य करु, अवघे होऊ श्रीमंत. काही दिवसांपासून 4- 5 गायी घेऊन त्यांची सेवा करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केली. हरिभाई देवकरण प्रशालेचे मुळे सभागृहात गायीचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीस गोमातेची पूजा झाली. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी समाजातील लाभार्थ्यांना 11 गायी वाटप करण्यात आल्या.

तसेच आयुर्वेदिक पशुखाद्य, औषध, गायी सांभाळण्याचे करारपत्र दिले. 10 बचत गटासंदर्भामध्ये बचत गटाची माहिती, त्याची स्थापना, गट कसे चालवायचे याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. शेवटी गायीचे संगोपनाचे सत्रामध्ये गायीचे महत्त्व, आहाराची व्यवस्था याची माहिती देण्यात आली. 

त्यावेळी जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी, पालकमंत्री देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सोनवणे, गोतज्ञ शशिकांत पुदे, मिलिंद देवल, ऍड. प्रदिपसिंग रजपूत, शिवाजीराव पाटील, रंगनाथ बंग, रंगनाथ बंकापुरे, शंभूसिंग चव्हाण, शिवानंद कल्लुरकर, सुधीर बहिरवडे, विजय यादव, सागर अतनुरे, प्रसाद देशपांडे उपस्थित होते.

सूत्रसंचालन सेवावर्धिनी प्रकल्पाचे प्रमुख हर्षन पाटील, सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर आभार कार्यवाहक सोमदत्त पटवर्धन यांनी मानले.

loading image
go to top