तळेगाव दिघे - बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

हरिभाऊ दिघे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

तळेगाव दिघे (नगर) : मालदाड (संगमनेर) शिवारात शनिवारी पहाटे चारच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास निंबाळे रोपवाटिकेत हलविले.

तळेगाव दिघे (नगर) : मालदाड (संगमनेर) शिवारात शनिवारी पहाटे चारच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास निंबाळे रोपवाटिकेत हलविले.

मालदाड शिवारात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु असल्याने त्यांना जेरबंद करण्यासाठी रामभाऊ शिवराम नवले यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. तिसऱ्या दिवशी कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात अंदाजे सव्वा वर्षे वयाचा मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. स्थानिक रहिवाशांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल बी. एल. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अंबादास मेहेत्रे, वनरक्षक वाय. आर. डोंगरे व श्री. पुंड यांनी वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने बिबट्यास निंबाळे (ता. संगमनेर) येथील रोपवाटिकेत हलविले. तेथून त्यास माणिकडोह (ता. जुन्नर जि. पुणे) येथील वनविभागाच्या बिबट्या निवारण केंद्रात पाठविण्यात येणार असल्याचे वनपाल अंबादास मेहेत्रे यांनी सांगितले. बिबट्यांच्या वास्तव्याने परिसरातील रहिवाशांत घबराट पसरली आहे. मालदाड परिसरात आणखी दोन बिबट्यांचे वास्तव्य असून वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी आणखी पिंजरे लावावेत, अशी मागणी युवक कार्यकर्ते विपुल नवले यांनी केली आहे.

Web Title: Talegaon Dighay - Leopard in a leopard cage