हे शहर झाले चिडीचूप; गल्ली- बोळ झाले बंद : तालुक्‍यात इतके रूग्ण सापडले

Tasgao city became freezed; 20 many patients were found in the taluka
Tasgao city became freezed; 20 many patients were found in the taluka

तासगाव (जि. सांगली)  : तासगाव शहरात कोरोनाचे एका वेळी पाच रुग्ण सापडल्याने तासगाव शहर पूर्णपणे लॉक डाऊन झाले आहे. परिणामी आज दुसऱ्या दिवशी शहर अक्षरशः चिडीचूप झाल्याचे चित्र दिसत होते. शहराच्या वेगवेगळ्या भागातील हे रुग्ण असल्याने संपूर्ण शहर कंटेंमनमेंट झोन बनल आहे. तालुक्‍यातीत आतापर्यंत 20 कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

तासगाव शहरातील दोन हॉस्पिटलममधील पाच कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे पाच ही कोरोना रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागातील मध्यवस्ती बाजारपेठेतील आहेत परिणामी पाच कंटनमेंट झोन मध्ये 80 टक्के शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे तासगावच कंटेंमनमेंट झोन बनले आहे. ज्या भागात रुग्ण रहातात तो 100 मीटर चा परिसर सील करण्यात आला आहे. या भागात जाणारे रस्ते पत्रे मारून बंद करण्यात आले आहेत.

सोमवार पेठ गुरुवार पेठ सराफ कट्टा जोशी गल्ली सिद्धेश्वर रोड त्याचबरोबर वरचे गल्ली चा उत्तर भाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सर्व रस्ते बंद असल्याने सध्या शहरात केवळ पायी ये जा करणे नागरिकांना भाग पडले आहे. औषध दुकाने दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने किराणामाल दुकाने वगळता कोणतेही दुकान दोन दिवसात उघडलेले नाही. कंटेनमेंट झोन वगळता बफर झोन मधील व्यवहार 14 दिवसानंतर सुरू होतील.

 कंटेनमेंट झोन मधील मात्र दुकाने 28 दिवसानंतर सुरू होतील अशी चिन्हे आहेत. आज बंद च्या दुसऱ्या दिवशी शहरातील रस्ते सुनसान आणि चिडीचूप झाले होते शहरातील सांगली विटा रस्ता हा एकच प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी साठी खुला ठेवण्यात आला आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com