cyber fraud targeting senior citizens
esakal
तासगाव (सांगली) : ‘तुमच्यावर गुन्हा दाखल आहे’, असे व्हिडिओ कॉलद्वारे भासवून सावळज (ता. तासगाव) येथील अण्णासाहेब बाळगोंडा पाटील (वय ६१) या सेवानिवृत्त शिक्षकांची तब्बल ५९ लाख ९ हजार रुपयांची फसवणूक (how cyber criminals cheat people) झाली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सायबर गुन्ह्याने तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.