तासगावला रुग्ण संख्या 947 ; मुख्याधिकाऱ्यांनाही लागण 

रविंद्र माने 
Tuesday, 8 September 2020

तासगाव : तालुक्‍यात सुरू असलेल्या टेस्ट मुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत रोज भरच पडत आहे. तासगाव तालुक्‍यातील कोरोना रुग्ण संख्या हजारावर पोहोचली आहे.

तासगाव : तालुक्‍यात सुरू असलेल्या टेस्ट मुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत रोज भरच पडत आहे. तासगाव तालुक्‍यातील कोरोना रुग्ण संख्या हजारावर पोहोचली आहे. आज तालुक्‍यात 58 कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. तासगाव शहरातही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात येताना दिसत नाही. आज शहरात 17 रुग्ण सापडले. तालुक्‍यातील रुगणांची संख्या 947 झाली आहे. तासगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

तासगाव शहराच्या आठ दिवसांच्या जनता करफू नंतर आज दैनंदिन व्यवहार सुरू झाले. 1 सप्टेंबर पासून शहरात तबबल 89 रुग्ण सापडले आहेत. विविध भागांतील 17 जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये वरचे गल्ली भागातील 6 रुगणांचा समावेश आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याची आज रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आली त्यामध्ये ते कोरोना बाधित झाल्याचे दिसून आले. 

तासगाव तालुक्‍याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा शिरकाव झाला असून सावळज मनेराजुरी परिसरात दररोज रुग्ण सापडत असल्याने नागरिक अक्षरशः हादरले आहेत. मनेराजुरी येथे 10, सावळज 6, चिखलगोठण 7 विसापूर 4 बिरणवाडी 2 तर कवठे एकंद, मांजर्डे, वासुंबे, ,वायफळे, नेहरूनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण मिळून आले. तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांमध्ये 329 नवे रुग्ण सापडले आहेत मार्च पासून आतापर्यंत कोरोना रुग्णांनाची संख्या 947 इतकी झाली आहे.  

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tasgaon has 947 patients; Infections also affect the head