तासगाव : सात गण महिलांसाठी आरक्षित

पंचायत समिती सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली.
sangli
sanglisakal

तासगाव : तासगाव पंचायत समितीसाठी आज पंचायत समिती सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. पंचायत समितीच्या १४ पैकी ७ गण महिलांसाठी, ३ ओबीसी प्रवर्गासाठी, तर येळावी आणि कवठेएकंद हे २ गण अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले. आरक्षण सोडतीसाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सोडतीनंतर इच्छुकांमध्ये ‘कहीं खुशी-कहीं गम’ असा माहोल तयार झाला होता.

तासगाव पंचायत समिती सभागृहात प्रांत तथा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रवींद्र रांजणे, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांच्या उपस्थितीत एका मुलाच्या हातून महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. गणामध्ये समाविष्ट गावांची लोकसंख्या त्यामधील अनुसूचित जाती-जमातींची आणि ओबीसी लोकसंख्या आणि २००२ पासूनच्या निवडणुकांमध्ये त्या-त्या गणात पडलेल्या आरक्षणावरून अनुसूचित जाती आणि ओबीसीशिवाय महिला राखीव, यावरून आरक्षण निश्चित करण्यात आले.

अनुसूचित जाती-जमातीच्या राखीव दोन जागांमधून महिला आरक्षणाची आणि ओबीसी (नामाप्र) प्रवर्गातील एक महिला राखीव, अशा केवळ दोन जागांसाठी चिठ्ठ्यांमधून आरक्षण काढण्यात आले. लांबलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आता टप्प्यावर आल्याने इच्छुकांमध्ये आरक्षणे काय पडणार, याबाबत उत्सुकता होती. आज आरक्षण जाहीर झाल्यानंतर काहीजण नाराज झाले, तर अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com