‘टास्क फोर्स’मध्ये पोलिस, जिल्हा प्रशासनासह अन्न व औषध विभाग, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कालच नशेखोरीविरोधात ‘टास्क फोर्स’ची (Task Force) स्थापना केली. खुद्द पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत. औद्योगिक वसाहतीतील बंद कारखान्यांची ‘टास्क फोर्स’ने माहिती घेतली. त्यात जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत १३४ बंद कारखाने आढळून आले. त्या कारखान्यांचीच आता झाडाझडती घेण्याची मोहीम ‘फोर्स’ने हाती घेतल्याची माहिती अधीक्षक संदीप घुगे (Sandeep Ghuge) यांनी पत्रकार बैठकीत दिली.