
तासगाव : मुख्याध्यापक बाईंच्या मुलीच्या साखरपुड्याला सारे गुरुजी निघून गेले आणि इकडे अख्खी शाळाच रिकामी झाली. शिक्षकाविना शाळा सुरू असल्याचे काही चौकस पालकांच्या लक्षात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या ध्यानी ही बाब लक्षात आली. त्यांनी चौकशी केली असता एकूण प्रकार लक्षात आला. तालुक्यातील बस्तवडे येथील शाळेतील हा प्रकार एकूण जिल्हा परिषदेसमोरची आव्हाने स्पष्ट करणारा आहे.