अवघड, सर्वसाधारण क्षेत्रातच आता बदल्या

- राजेंद्र पाटील
बुधवार, 1 मार्च 2017

शिक्षकांसाठी शासनाचे नवे धोरण जाहीर; शिक्षण क्षेत्रात होणार मोठे फेरबदल

कोल्हापूर - जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने बदल्याचे नवे धोरण आज जाहीर केले. त्यानुसार यापुढे शिक्षकांच्या अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांतील शाळांतच बदल्या होणार आहेत. या नव्या आदेशामुळे शिक्षकवर्ग कमालीचा हवालदील झाला असून, शिक्षणक्षेत्रात मोठे फेरबदल होणार आहेत.

शिक्षकांसाठी शासनाचे नवे धोरण जाहीर; शिक्षण क्षेत्रात होणार मोठे फेरबदल

कोल्हापूर - जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने बदल्याचे नवे धोरण आज जाहीर केले. त्यानुसार यापुढे शिक्षकांच्या अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांतील शाळांतच बदल्या होणार आहेत. या नव्या आदेशामुळे शिक्षकवर्ग कमालीचा हवालदील झाला असून, शिक्षणक्षेत्रात मोठे फेरबदल होणार आहेत.

जिल्हा परिषद सर्व विभागांत काम करणाऱ्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वी बदलीचे एकच धोरण होते. शिक्षक वर्गाची मोठी संख्या व इतर विभागापेक्षा शिक्षकांच्या कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन शासनाने शिक्षकांना केंद्रबिंदू मानून, त्यांच्या अडी-अडचणी विचारात घेऊन फक्त शिक्षकांसाठी जिल्ह्यांतर्गत बदल्याचे नवे सुधारित धोरण जाहीर केले आहे. या नव्या धोरणानुसार अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांत जिल्ह्यांतील शाळांची वर्गवारी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे तालुक्‍यातील सर्वसाधारण, तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अवघड क्षेत्रातील गावे व शाळा ठरविणार आहेत.
अवघड क्षेत्र म्हणजे...

जे गाव, शाळा तालुका मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोचण्यास सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे अवघड क्षेत्र म्हणून निश्‍चित केली जाणार आहेत.

सर्वसाधारण क्षेत्र म्हणजे...
अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे, शाळा सर्वसाधारण क्षेत्रात ओळखली जातील.
यांच्या बदल्या होणार
जिल्हा परिषद शाळांत काम करणारे प्राथमिक, माध्यमिक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे.
हेच बदलीस पात्र
ज्या शिक्षकांची सेवा अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण झाली आहे, असे शिक्षकच बदली अधिकारास प्राप्त राहतील, तर सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची सेवा दहा वर्षे पूर्ण झाली असेल, असे शिक्षक बदलीस पात्र ठरतील.
 

यांना मिळणार बदलीतून सूट
पक्षाघाताने आजारी कर्मचारी
अपंग कर्मचारी व अपंग मुलांचे पालक
हृदयशस्त्रक्रिया झालेले कर्मचारी
जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले कर्मचारी अथवा डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी
आजी-माजी सैनिक/जवानांच्या पत्नी किंवा विधवा 
विधवा कर्मचारी  कुमारिका कर्मचारी
परितक्ता किंवा घटस्फोटित कर्मचारी
वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी

‘सकाळ’मध्ये सर्वप्रथम वृत्त
दैनिक ‘सकाळ’च्या ९ जानेवारी २०१७ च्या अंकात शासन शिक्षकांसाठी बदल्यांचे नवीन धोरण करणार असून, यापुढे अवघड व सर्वसाधारण या दोन क्षेत्रांतच शिक्षकांच्या बदल्या होतील, असे वृत्त प्रसिद्ध केले होते.

Web Title: teacher transfer policy