भाजपला येत्या विधानसभा निवडणूकीत शिक्षकांची ताकद दाखवू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या  -

  • शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे
  • अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ग तुकड्यांना निधीसह घोषित करावे
  • काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे

कोल्हापूर - वीस टक्के अनुदान प्राप्त शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थी - विद्यार्थिंनी मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजप सरकारला येत्या विधानसभा निवडणूक शिक्षकांची ताकद दाखवू, अशा इशारा यावेळी कृती समितीने दिला आहे. 

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या  -

  • शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे
  • अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ग तुकड्यांना निधीसह घोषित करावे
  • काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे

समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, गजानन काटकर, आनंदा वारंग, प्रेमकुमार बिंदगे, भानुदास गाडे, सावता माळी, संतोष जत्ते, जनार्दन दिंडे, अनिल लायकर, शिवाजी कुरणे, राजेंद्र माने, शिवाजी घाडगे, संदीप यादव, सागर पाटील, मनीषा रानमाळे, गौतमी पाटील, नेहा भुसारी यांनी मोर्चाचे संयोजन केले.

मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या पाच सप्टेंबरला सामूहिक आत्मदहन केले जाईल. तसेच येत्या विधानसभेत भाजप सरकार शिक्षकांची ताकद दाखवू.
- खंडेराव जगदाळे,
उपाध्यक्ष, कृती समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers agitation in Kolhapur for different demands