esakal | इथे शिक्षक बनले रक्षक! 
sakal

बोलून बातमी शोधा

teachers doing pollicing in Diganchi-Sangali

लोकांनी बाहेर पडू नये म्हणून अहोरात्र पोलिस रस्त्यावर गस्त घालत आहेत. त्यांना आता दिघंची (जि. सांगली) येथील पाच शिक्षकांचीही साथ लाभली आहे.

इथे शिक्षक बनले रक्षक! 

sakal_logo
By
गणेश जाधव

दिघंची : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळीकडे लॉकडाउन सुरू आहे. या कालावधीत लोकांनी बाहेर पडू नये म्हणून अहोरात्र पोलिस रस्त्यावर गस्त घालत आहेत. त्यांना आता दिघंची (जि. सांगली) येथील पाच शिक्षकांचीही साथ लाभली आहे. सामाजिक बंधिलकीतून वाहतूक सुरक्षा अधिकारी म्हणून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून ते विनामोबदला कर्तव्य बजावत आहेत. 

तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणारे दिघंची गाव. या गावाजवळच सातारा हद्दीतून येणाऱ्यांसाठी 5 कि.मी. अंतरावर लिंगीवरे; तर सोलापूर जिल्हा हद्दीसाठी दिघंचीपासून 3 कि.मी. अंतरावर बॅरिकेड लावले आहेत. याचबरोबर तालुक्‍यातील मोठी व्यापारपेठ व आटपाडीनंतर दिघंची हे मोठे गाव. या तीन ठिकाणी उपनिरीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोथे व कॉन्स्टेबल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिक्षक काम करीत आहेत. पोलिस स्टाफ कमी असल्याने त्यांना चांगली मदत होत आहे.

यामध्ये प्रमोद डोंबे (न्यू इंग्लिश स्कूल, लिंगीवरे), जितेंद्र कांबळे (दिघंची हायस्कूल), अमोल वसेकर (इंद्रभागू हायस्कूल, दिघंची), तानाजी जरे (वत्सलादेवी हायस्कूल, आटपाडी), प्रकाश पाटील (गर्ल्स हायस्कूल, दिघंची) या शिक्षकांचा समावेश आहे. या सर्वांना सातारा येथे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले असून; सध्या त्यांची वाहतूक सुरक्षा पथक अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दिघंची परिसरात ते आपले कर्तव्य बजावत आहेत. 

आमचाही थोडा ताण कमी

खाकी ड्रेस असणारे वाहतूक सुरक्षा अधिकारी म्हणून या शिक्षकांची आम्हाला चांगली मदत होत आहे. परिणामी आमचाही थोडा ताण कमी होत आहे. 
- शिवाजी बोथे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

loading image