esakal | शिक्षकांना वेतनाची  माहिती मोबाईलवर...पलूस तालुक्‍यात ई - बुक सॅलरी
sakal

बोलून बातमी शोधा

ONLINE MOBILE.jpg

पलूस (सांगली) - पलूस पंचायत समितीकडील प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या पगाराची समग्र माहिती आता ई-बुक ऍपव्दारे मोबाईलवर उपलब्ध करुन देत असल्याचे गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांनी सांगितले. 

शिक्षकांना वेतनाची  माहिती मोबाईलवर...पलूस तालुक्‍यात ई - बुक सॅलरी

sakal_logo
By
संजय गणेशकर

पलूस (सांगली) - पलूस पंचायत समितीकडील प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या पगाराची समग्र माहिती आता ई-बुक ऍपव्दारे मोबाईलवर उपलब्ध करुन देत असल्याचे गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांनी सांगितले. 

पलूस तालुक्‍यातील अडीचशे प्राथमिक शिक्षकांना अद्ययावत आपला पगार व पगारातून जि. प. भविष्य निर्वाह निधी, अंशदान कपात निधी, विमा हप्ता, शिक्षक बॅंक व इतर वजावटीची वसुली जाता चालू महिन्यात निव्वळ पगार किती याबाबत समग्र माहिती मोबाईलवर कळावी. यासाठी ई - बुक सॅलरी सुरू केली आहे. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी ई-बुक सॅलरी ऍप विषयी माहिती दिली. मुख्याध्यापक मोहसीन पठाण यांनी ई-बुक बाबत सतिश नलवडे,राजेंद्र माळी, विशाल पतंगे यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले.

पलूस तालुक्‍यातील शिक्षकांना याचा लाभ देण्याची कार्यवाही केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी केली. माहे जुलै पेंड इन ऑगष्ट 2020 पासून तालुक्‍यातील सर्व शिक्षकांना देण्यात येणार आहे. पं. स. सभापती दिपक मोहिते, उपसभापती अरुण पवार, प. स. सदस्य रामचंद्र वरुडे, शिक्षणविस्तार अधिकारी अशोक जाधव यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, धोंडीराम पिसे, प्रदिप मोकाशी, संदिप कांबळे, राजेंद्र कांबळे, वरिष्ठ लिपिक जमादार, श्रीम.पठाण, धनंजय भोळे, ज्ञानेश्वर रोकडे, शंकर टकले, नंदकुमार नाटेकर, अनिल जाधव, अनिल नरदेकर आदि उपस्थित होते. 

संपादन : घनशाम नवाथे