मिस्त्री, आचारी, डाटा ऑपरेटरनंतर आता फोटोग्राफर 

राजेंद्र पाटील - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - शिक्षण विभागाचा संपूर्ण कारभार ऑनलाइन करण्याच्या नावाखाली शिक्षकाला अनेक कामांत शासनाने सतत गुंतवून ठेवले आहे. यापूर्वी शाळेच्या खोल्या बांधण्यासाठी शिक्षकाने मिस्त्रीची भूमिका पार पाडली, माध्यान्ह भोजनासाठी आचारी बनला, ऑनलाइन कामांसाठी डाटा ऑपरेटरचे काम सुरू असतानाच आता सेल्फीसाठी त्याला फोटोग्राफर व्हावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेत शाळा ज्यांच्यासाठी आहेत तो विद्यार्थी व त्याची शैक्षणिक प्रगती, सर्वांगीण विकास याकडे दुर्लक्ष होत नाही ना? याबाबत विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

आधुनिक काळाबरोबर अपडेट व्हायला हवे; पण त्यासाठी शासनाने सुविधाही पुरविण्याची गरज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात डोंगरी, दुर्गम भागात, वाड्या-वस्त्यांवर सरकारी शाळा आहेत. अनेक शाळांत विजेची सोय नाही. संगणक उपलब्ध नाहीत. मोबाइलला रेंज मिळेलच याची खात्री नाही. अशा परिस्थितीत वातानुकूलित खोलीत बसून पेपरलेस कारभार करण्यासाठी ऑनलाइन माहिती मागविणे सोपे आहे; पण ती पुरविण्यासाठी शिक्षकांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल, याचाही विचार व्हायला हवा. गेल्या एक-दोन वर्षांत शिक्षकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती शिक्षकसंच मान्यतेसाठी "सरल' प्रणालीमध्ये भरली आहे. 

विद्यार्थ्याने शाळा सोडल्याच्या दाखल्याची देवाण-घेवाण, शिक्षकांची संपूर्ण माहिती, शाळेतील सोई-सुविधांसह माहिती. मध्यान्ह भोजन योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांची दैनंदिन माहिती, इ. 5 वी व 8 वीचे शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज, स्वच्छ भारत विद्यालय योजना माहिती, इन्स्पायर ऍवार्ड योजना तसेच सावित्रीबाई फुले, सुवर्ण-महोत्सव आदिवासी शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्ज आदी माहितीबरोबरच शिक्षकांचे प्रशिक्षण, शालार्थ प्रणालीमध्ये वेतनपत्रके भरणे आदी कामांची माहिती ऑनलाइन भरली जात आहे. यामध्ये शिक्षकांचा वेळ वाया जातो. जेथे सुविधा नाही तेथे तसेच वयस्कर शिक्षकांना ज्यांना ऑनलाइन माहिती भरणे जमत नाही ते नेटकॅफेमध्ये पदरमोड करून माहिती भरत आहेत त्याचा शिक्षणव्यवस्थेवर परिणाम होत आहे. 

डाटा ऑपरेटर्स द्यावेत... 
शिक्षण विभागाचा संपूर्ण कारभार ऑनलाइन करायचा असेल तर शासनाने किमान दहा शाळेमागे असलेल्या केंद्र शाळेत डाटा ऑपरेटर भरावेत व त्याच्याकडून काम करून घ्यावे. अशैक्षणिक कामाचा बोजा वाढवून अध्यापनाच्या मूळ कामापासून शिक्षकांना दूर करू नये, हीच माफक अपेक्षा शिक्षक व पालकांची आहे. 

Web Title: Teachers will be photographers