बेळगावात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक थंडीची नोंद, पारा ११ अंशावर

temperature for winter in belgaum increased in 11 point celsius today
temperature for winter in belgaum increased in 11 point celsius today
Updated on

बेळगाव : शहरासह ग्रामीण भागात सोमवारी (ता. २१) रात्रीपासून अचानक थंडीत वाढ झाली असून पारा ११ अंशापर्यंत खाली घसरला आहे. यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसत आहे. सकाळी व सायंकाळची रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे.

नोव्हेंबरच्या सुरवातीला थंडीला सुरवात झाली; पण अचानक तापमान वाढू लागले होते. त्यामुळे, थंडी गायब झाली होती. मागील चार दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. मात्र, दोन दिवसांपासून प्रचंड वाढ झाली आहे. किमान तापमान ११ तर कमाल तापमान २९ अंशापर्यंत खाली आले आहे. बोचरे वारे अंगाला शहारे आणत असल्यामुळे दिवसाही लोक स्वेटर, मफलर, कानटोप्या, जर्कीन घालून घराबाहेर पडत आहेत. 

हेही वाचा - क्षणातच झाले होत्याचे न्हवते ; अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू -

चहाच्या दुकानांवरील गर्दी वाढली आहे. रात्री शेकोट्याही धडधडू लागल्या आहेत. शहरात मंगळवारी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक थंडीची नोंद झाली. थंडीमुळे मॉर्निग वॉक, मैदानावर व्यायाम व खेळणाऱ्या तरुणाची संख्याही घटल्याचे जाणवत होते. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात हिवाळा असतो. मात्र, यंदा नोव्हेंबरमध्ये म्हणावी तशी थंडी पडली नव्हती. डिसेंबरच्या अखेरीस थंडीत वाढ झाली आहे. रात्री सातनंतर थंडीत कमालीची वाढ होत असून वाहनधारकही थंडावले आहेत. यामुळे हॅंन्डग्लोव्हज व जॅकेटला मागणी वाढली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Almatti Dam water level latest news
Dhairyashil Kadam SIR campaign statement
Atpadi student NEET success story
Karnataka Hippargi Barrage gates
Marathi News Esakal
www.esakal.com