
आरग : नव्या वर्षातील पहिल्याच आठवड्यात आरग (ता. मिरज) येथील मंदिरात चोरी झाली होती. त्यातील चोरटा आजच गजाआड केला. तोवर आणखी एका मंदिरात चोरीची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. आरग लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरातून देवीचे सोने, चांदीचे दागिने, दानपेटी आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी गायब केला. आठवड्यातील दुसऱ्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.