
कुपवाड : कत्तल करण्याचा हेतूने पंधरा जनावरे नेणारा टेम्पो कुपवाड पोलिसांनी गुरुवारी तानंग फाटा येथे पकडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. मेहबूब हुसेन जातकार (वय २४), तसेच सद्दाम अमीन साहब शेख (वय २४, दोघे रा. कृष्णा नदी घाट, मिरज) अशी संशयितांची नावे आहेत. याची फिर्याद पोलिस हवालदार सुधीर शंकर गोरे यांनी दिली.