निविदा प्रसिद्ध झाली, पुढे काय झाले, माहित नाही...

सदाशिव पुकळे
Monday, 15 February 2021

कुरुंदवाडी (ता. आटपाडी) येथील कराड - पंढरपूर महामार्गाला जोडणारा बिरोबा मंदिरकडे जाणारा, तर विभूतवाडी ते बिरोबा मंदिरकडे जाणारा, तर झरे खरसुंडी रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. रस्त्याचे काम अनेक दिवसापासून रखडले आहे.

झरे : कुरुंदवाडी (ता. आटपाडी) येथील कराड - पंढरपूर महामार्गाला जोडणारा बिरोबा मंदिरकडे जाणारा, तर विभूतवाडी ते बिरोबा मंदिरकडे जाणारा, तर झरे खरसुंडी रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. रस्त्याचे काम अनेक दिवसापासून रखडले आहे. निविदा प्रसिद्ध झाली आहे. पुढे काय झाले, माहित नाही अशी स्थिती आहे. संबंधित विभागांनी लक्ष घालून काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी सरपंच सविता वगरे यांनी केली आहे. 

कुरुंदवाडी विभुतवाडीच्या ीसमेवर बिरोबा मंदिर आहे. राज्य तसेच कर्नाटक, राजस्थान व अन्य राज्यांत ते प्रसिद्ध आहे. भाविक आमावस्या-पौर्णिमेला येतातात. मंदिराकडे जाणारे दोन्ही रस्ते खराब आहेत. खडी उचकटली आहे. सरपंच सविता वगरे, उपसरपंच बिरुदेव खोत, सर्व सदस्य, माजी उपसभापती नारायण चवरे, माजी पंचायत समिती सदस्य प्रा. साहेबराव चवरे व देवस्थान कमिटी, (झरे-विभुतवाडी), कुरुंदवाडीचे ग्रामस्थ रस्ता होण्यासाठी झटत आहेत. 

खानापूर आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांनी रस्ता कामाचा पाठपुरावा केला. कुरुंदवाडीतील सर्वपक्षीय समिती व आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी गेले. बैठक झाली. ग्रामस्थांनी रस्त्याचे काम त्वरित करावे, अशा मागणीचा जोर धरला. रस्ता कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. ठेकेदार काम सुरू करीत नाहीत. गौडबंगाल काय ? म्हणून नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. 

आमावस्या, पौर्णिमा व रविवार तसेच आठवड्यातील काही दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. झरे व विभूतवाडीकडून येणारा असे दोन्ही रस्ते रस्ते खराब झाल्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. म्हणून रस्त्याचे काम लवकर सुरू करावे. 
- सविता वगरे, सरपंच 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tender was published, what happened next, I don't know ...