बालविवाह रोखण्यात आल्याने भेंडीगेरी गावात तणावाचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालविवाह
बालविवाह रोखण्यात आल्याने भेंडीगेरी गावात तणावाचे वातावरण

बालविवाह रोखण्यात आल्याने भेंडीगेरी गावात तणावाचे वातावरण

बेळगाव - बालविवाह रोखण्यात आल्याने भेंडीगेरी (ता. बेळगाव) गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काहींनी संगोळी रायान्नांच्या पुतळ्यावर दगडफेक करण्यासह पुनीत राजकुमार यांच्या फोटोची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आल्याने शनिवार (ता. २१) ही परिस्थिती निर्माण झाली झाली. घटनेच्या पार्श्वभूमीवर हिरेबागेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भेंडीगेरी येथे आज एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह केला जात आहे. अशी माहिती गावातील काहींनी दहा १०९२ या चाईल्ड वेल्फेअरच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भेंडीगेरी गावात दाखल होत होणारा बालविवाह रोखला. त्यानंतर काही वेळातच गावातील संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्यावर दगडफेक करण्यासह तेथील पुनीत राजकुमार यांच्या फोटोची देखील तोडफोड झाल्याची अफवा उठवण्यात आली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जमाव मोठ्या संख्येने व त्या ठिकाणी जमा झाल्याने लागलीच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पुतळ्यावर दगडफेक झाली नसून बालविवाह रोखण्यात आल्याने बनाव हा प्रकार करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेच्या पार्श्‍वभूमीवर गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

Web Title: Tensions In Bhendigeri Village Preventing Child Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..