बापरे...येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात भयानक स्फोट 

MSEB SUB STATION KARVE.jpg
MSEB SUB STATION KARVE.jpg
Updated on

सांगली- कार्वे (ता. खानापूर) येथील महापारेषण कंपनीच्या 220/33 केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात सायंकाळी पाचच्या सुमारास भयानक स्फोट झाला. तांत्रिक बिघाड होऊन स्फोट झाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाली. या स्फोटात महापारेषणचा 50 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र जळाले. सुमारे अडीच कोटी रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 


खानापूर तालुक्‍यातील कार्वे येथे महापारेषण कंपनीचे अतिउच्चदाब वीज उपकेंद्र आहे. तेथून संपूर्ण परिसराला वीज पुरवठा केला जातो. आज सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड होऊन मोठा स्फोट झाला. पाठोपाठ आगीचे लोळ उठले. स्फोटाच्या आवाजाने परिसरातून जाणारे नागरिक घाबरले. स्फोटानंतर भडकलेली आग आणि धूर पाहून परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अनेकजण हा प्रकार पाहण्यासाठी धावले.

तत्काळ अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. आगीची तीव्रता पाहून विटा आणि तासगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धावल्या. काही वेळातच आग आटोक्‍यात आणली. परंतू आगीमध्ये 50 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र पूर्णपणे जळाले. त्यामुळे सुमारे अडीच कोटी रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रोहित्र जळाल्यामुळे महापारेषणकडून महावितरणला होणारा वीज पुरवठा बंद झाला. त्यामुळे पर्यायी यंत्रणेद्वारे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. लवकरच महावितरणला वीज पुरवठा केला जाईल असे महापारेषणच्या सुत्रांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com