दहशत कोरोनाची : ग्रामीण भागात सुद्धा प्रेताला खांदा मिळेना

सदाशिव पुकळे
Friday, 18 September 2020

कोरोनामुळे सामाजिक एकतेची झालर उसवु लागली आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा प्रेत स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी भाऊबंद धजवेनात. अशयाच्या घटना घडू लागल्या आहेत. 

झरे (जि . सांगली)  : कोरोनामुळे सामाजिक एकतेची झालर उसवु लागली आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा प्रेत स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी भाऊबंद धजवेनात. अशयाच्या घटना घडू लागल्या आहेत. 

अशीच एक घटना घडली आहे पंचवीस वर्षाची तरुणी बी फार्मसी झाली होती. एका कंपनीमध्ये चांगल्या पगार ने कामाला होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी आली होती. तिचे आई-वडील भाऊ एकत्रच राहत होते. 
मागील चार दिवसांमध्ये तिला थोडासा त्रास होऊ लागला असल्याने तिला त्वरित दवाखान्यांमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी पुढील मोठ्या दवाखान्यांमध्ये नेण्यास सांगितले. व त्वरित मोठ्या दवाखान्यात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती व तिचा मृत्यू झाला. तिला घरी आणण्यात आले सर्व तयारी करण्यात आली परंतु त्या प्रेताला खांदा देण्यासाठी भाऊबंदकीतील लोकांनी नकार दिला. 

ग्रामीण भागामध्ये प्रेताला खांदा देण्यासाठी प्रत्येक भावकितला एक माणूस असे खांदा देतात. परंतु इथे उलटेच घडले काही भावकीतली लोकांनी खांदा देण्यासाठी आलीच नाहीत. त्यामुळे जमेल त्यांनी खांदा देऊन ते प्रेत स्मशानभूमी पर्यंत नेले. म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा माणुसकी संपत चाललेली आहे हे यावरून दिसून येत आहे.

त्या कुटुंबातील आई वडील मुलगा आणि मुलगी असे चार जणच आहेत. वडील एका खाजगी बॅंकेमध्ये कामाला आहेत बॅंकेचे कर्ज काढून उसनवारी करून मुलीला मोठ्या जिद्दीने शिकवलं नोकरी पण लागली. परंतु हाता तोंडाला आलेला घास परमेश्वराने हिरावून घेतला. याचंच दुःख सर्वांना होत आहे. अशी मन हेलावून टाकणारी घटना घडली असून ग्रामीण भागात सुद्धा माणुसकीचे नाते हिरावत चालले असल्याचे वरील घटनेवरून दिसून येत आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: terror of Coronat : Even in rural areas no relatives ready to carry dead body