`सीएनसी` ट्रेड होणार अत्याधुनिक | Nipani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएनसी

निपाणी : `सीएनसी` ट्रेड होणार अत्याधुनिक

निपाणी : शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सीएनसी ट्रेडकडे कल वाढला आहे. मात्र निपाणी शहरात केवळ एकाच सरकारी आयटीआय महाविद्यालयात हा ट्रेड उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येथे येऊन सीएनसीचे प्रशिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आता या ट्रेडमध्ये अत्याधुनिक मशिनरींचा वापर करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात हा ट्रेड असलेल्या संबधित आयटीआयमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्री मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आणखी चांगली सोय होणार आहे.

विविध ट्रेडचे महागडे प्रशिक्षण घेण्यापेक्षा केवळ कमी कालावधी व कमी रक्कमेत सीएनसीचे हे प्रशिक्षण पूर्ण करता येत आहे. तसेच नोकरीची हमखास संधी मिळत असल्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासह सीएनसी ट्रेडचे प्रशिक्षणही पूर्ण करत आहेत. तीन महिन्यात हे प्रशिक्षण पूर्ण होत असल्याने पुन्हा विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे चित्र निपाणी तालुक्यात दिसत आहे.

हेही वाचा: वाई पालिकेत स्वच्छतेवरून मुकादम धारेवर

मात्र कर्नाटक शासन व आयटीआय महामंडळाने प्रत्येक आयटीआयमध्ये या ट्रेडला मान्यता देणे गरजेचे आहे. तशी मान्यता मिळाल्यास शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. पालकातूनही तशी मागणी वाढत आहे. दोन वर्षापूवी केवळ निपाणी या एकाच केंद्रातून एक हजार विद्यार्थ्यांनी सीएनसीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याचा त्यांना चांगला लाभ मिळाला आहे.

पालकांचा ओढा कौशल्य शिक्षणाकडे

सध्या नोकरीच्या संधी मिळत नसल्याने पालकही कौशल्य प्रशिक्षणाकडे आपल्या पाल्यांना पाठवित आहेत. त्याचा भविष्यात लाभ मिळणार असल्याचे निश्चित धरून हा निर्णय पालक घेत आहेत. नोकरी नाही मिळाली तर किमान व्यवसाय तरी करता येणार असल्याचे पालक हा निर्णय घेत आहेत.

`सीएनसी ट्रेडला चांगली मागणी आहे. विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. प्रत्येक महाविद्यालयात हा ट्रेड उपलब्ध केल्यास विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे.`

-अजित सातवर, प्रशिक्षक, सरकारी आयटीआय, निपाणी

loading image
go to top