
आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे महावितरणने साडेतीन कोटी खर्च करून ३३ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारले आहे. मात्र वनविभागाने तीन विद्युत पोल उभा करण्याची परवानगी दिली नसल्यामुळे ते सुरू झाले नाही. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी उपकेंद्राचा अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली.