सांगली - अहिल्यानगर परिसरात घरफोडी करणारा चोरटा जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सांगली - अहिल्यानगर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेष्णच्या पथकाने जेरबंद केले. रोहित गणेश गोसावी ( 22, प्रकाशनगर गल्ली 2, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून संसारोपयोगी साहित्यांसह सोन्याच्या अंगठ्या असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सांगली - अहिल्यानगर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेष्णच्या पथकाने जेरबंद केले. रोहित गणेश गोसावी (वय 22, प्रकाशनगर गल्ली 2, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून संसारोपयोगी साहित्यांसह सोन्याच्या अंगठ्या असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

अधिक माहिती अशी, की घरफोडी, जबरी चोरीतील सराईत गुन्हेगारांची तपासणीकरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी एलसीबीला दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील पोलिस गस्तीवर होते. अहिल्यानगर चौकात एकजण चोरीची वस्तू विकणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकास खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता त्याने तीन महिन्यांपूर्वी अहिल्यानगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. ते साहित्य घरी असल्याचे सांगितले.

पोलिसांनी तातडीने घराची झडती घेतली. तेथून तांब्याची कळशी, तांब्याचा कलश, तांब्याचा ग्लास, टीव्ही, एलसीडी, 10 ग्रॅम वजनाचे दोन पिळ्याच्या अंगठ्या, चोरीचा गॅस सिलिंडर असा 93 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कारवाईत उपनिरीक्षक अंतम खाडे, अमित परीट, शशिकांत जाधव, सचिन कणप, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, विमल नंदगावे, शुभांगी मुळीक, वनिता चव्हाण यांचा सहभाग होता. 

आणखी गुन्हे उघडकीस येणार 
संशयित सराईत गुन्हेगार असून त्याने अहिल्यानगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून आणखी काही घरफोडी उघडकीस येण्याची शक्‍यता असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft arrested in case of robbery in Ahilyanagar Sangli