Sangli Bus Stand Roberry : साडेचार लाखांची रोकड सांगली बसस्थानकातून चोरीस; गर्दीचा गैरफायदा घेऊन बॅगेमधील पैसे गायब
Sangli Bus Stand Crime : सासूने बँकेत गहाणवट ठेवलेले त्यांचे दागिने सोडविण्यासाठी पत्नी सौ. आनंदी, मुलगी रितिकासह ते १७ मार्च रोजी आपल्या मूळगावी उसलमपट्टीकडे दागिने सोडविण्यासाठी ४ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन निघाले होते.
सांगली : येथील मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी बसमधून निघालेल्या एका प्रवाशाची चार लाख ७० हजारांची रोकड चोरट्याने चोरीस गेली. याप्रकरणी धनापांडे उचीकाले देवर (वय ४०, विटा, ता. खानापूर) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.