भगवानबाबाच्या घरात का आले होते तीन सैतान...

bhagwan gadh chori
bhagwan gadh chori

नगर : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्‍यातील भगवानबाबा गडावर चोरी झाली आहे. हा सैतानीपणा नेमका कोणाच्या डोक्यातून उतरला याची चर्चा सध्या सुरू आहे. काहीजणांनी या घटनेमागे राजकारण असल्याचाही संशय व्यक्त केला आहे.

बाबांची जी बंदूक चोरी गेली तो केवळ सांगाडा होता. त्या सांगाड्याची चोरी करून नेमके काय साध्य करायचं आहे, यावरूनही तर्कवितर्क काढले जात आहेत.

या घटनेमुळे बाबांच्या भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. चोरी झाल्याची माहिती समजताच भाविकांनी गडावर धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. 

भगवान बाबांनी त्यांच्या हयातीत वापरलेल्या वस्तूंचे भगवान गडावर एक स्वतंत्र दालन आहे. तेथे त्यांनी वापरलेला कोट, काठी, ज्ञानेश्‍वरी ग्रंथ, बंदूक, तलवार, फेटा, कपडे, पाणी तापविण्यासाठीचा बंब ठेवण्यात आला आहे. त्यातील रायफल आणि तलवार चोरीला गेली आहे. 


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भगवानबाबांचे समर्थक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्‍यात भगवानबाबा गड बांधण्यात आला आहे. भक्तांना बाबांच्या वापरातील वस्तूंचे दर्शन घेता यावे, यासाठी भगवानबाबा गडावर संग्रह ठेवण्यात आला आहे. 


गडावरील शो-केसमध्ये ठेवण्यात आलेली भगवानबाबांची तलवार आणि बंदुकीचा सांगाडा चोरीला गेल्याचं उघड झालं आहे. या चोरीमुळे भगवान गडावरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

काय आहे इतिहास भगवानगडाचा 
मराठवाड्याचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवान गडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्यानने पावन झालेला भगवान गड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील दसरा मेळाव्यास महाराष्ट्रातून भाविक जमायचे. नंतर मात्र, या दसरा मेळाव्यावरून राजकारण तापले. त्यामुळे हा दसरा मेळावा बंद झाला होता. त्याच दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते. 

धागेदोरे लागले हाती 
पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. तीनजण बुधावारी मध्यरात्री मोटारसायकलवरून गडावर आले. तेथे त्यांनी शो केसमध्ये ठेवलेली बंदूक व तलवार चोरून नेली. मात्र, या चोरी करणाऱ्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नाही. परंतु पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे या चोरीचा उद्देश लवकरच उघड होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com