अबब... इचलकरंजीत 'इतक्या' लाख युनिटची वीज चोरी...

Theft of electricity has been revealed in Ichalkaranji marathi news
Theft of electricity has been revealed in Ichalkaranji marathi news
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) - वीजमीटरमध्ये छेडछाड करून त्याची गती कमी करत ३ लाख ४३ हजार ५५८ युनिटची वीज चोरी केल्याची घटना इचलकरंजीतील संगमनगरमध्ये उघडकीस आली आहे. दोन वीजचोरांविरुद्ध जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वीजचोरीपोटी ४७ लाख २१ हजार, तर तडजोड आकारापोटी २१ लाख, असा एकूण ६८ लाख रुपयांचा दंड वीजचोरांना ठोठावला आहे. महावितरणच्या इचलकरंजी विभागातील शाखा यड्रावमधील सहायक अभियंता अभिजित बिरनाळे यांनी फिर्याद दिली.

दोन टेक्‍स्टाईलवर छापा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यड्राव शाखेंतर्गत तारदाळ येथे शिवराज काशिनाथ लोले यांची मे. शिवराज टेक्‍स्टाईल्स, तर जगन्नाथ काशिनाथ लोले यांचे आदिनाथ टेक्‍स्टाईल्स पावरलूम कनेक्‍शनची जोडणी आहे. शिवराज टेक्‍स्टाईल्सची ४ लाख १९ हजार, तर आदिनाथ टेक्‍स्टाईल्सची ५ लाख ४८ हजार रुपयांची थकबाकी होती. त्यामुळे जुलै २०१९ला त्यांचा वीजपुरवठा बंद केला होता. उपकार्यकारी अभियंता सुनील आकिवाटे व सहायक अभियंता अभिजित बिरनाळे वीज कर्मचाऱ्यांना घेऊन मीटर तपासणीसाठी तेथे गेले होते. तेथे वीजपुरवठा अनधिकृतपणे जोडून मीटरला मागून छिद्र पाडून मीटरची गती कमी केल्याचा संशय त्यांना आला. पंचांसमक्ष दोन्ही मीटरची चाचणी विभागात तपासणी केली. त्यात मीटरची गती ३५ व ५२ टक्‍क्‍यांनी संथ केल्याचे निदर्शनास आले.

६८ लाखांचा ठोठावला दंड

शिवराज टेक्‍स्टाईल्सला १८ लाख ६१ हजार १८३, तर आदिनाथ टेक्‍स्टाईल्सला २८ लाख ६० हजार ११६ रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विद्युत कायद्यातील कलम १५२ नुसार तडजोड आकार प्रत्येकी १० लाख ५० हजार रुपये इतका दंड भरावा लागणार आहे. वीजचोरांविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. 
गळतीच्या भागावर लक्ष

इचलकरंजी विभागात विजेची मागणी मोठी आहे. महावितरणला पॉवरलूमसह औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापराची सविस्तर माहिती ऑनलाईन मिळते. या माहितीच्या आधारे गळती असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करून वीजचोरी उघडकीस आणली आहे. चोरांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जात असल्याचे महावितरणच्या इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता सोमण्णा कोळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com