Miraj Bus Stand : मिरज बसस्थानकावर चोरीचे प्रकार वाढले; २ लाखांच्या ऐवजावर डल्ला

Miraj News : मिरजेतील बसस्थानकावरून निम्म्या राज्यात बससेवा आहे. त्याशिवाय कर्नाटकातील फेऱ्यांचाही समावेश आहे. कोकणासह विदर्भात जाणाऱ्या बसही मिरजेतून जातात. लागूनच असलेल्या रेल्वे स्थानकामुळेही बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते.
Bus Stand
Bus StandSakal
Updated on

मिरज : महाराष्ट्रासह कर्नाटकातील प्रवासाच्या निमित्ताने प्रवाशांचा नेहमीच राबता असलेल्या मिरज बसस्थानकावर आता चोरीचे प्रकार वाढले आहेत. बसस्थानकाची इमारत पाडून तात्पुरत्या स्वरूपात समोरूनच बससेवा देण्यात येत आहे. त्या ठिकाणी जागा कमी असल्याने गर्दी वाढत असते. नेमका याचाच फायदा घेत चोरट्यांकडून प्रवाशांच्या बॅगा, पर्सवर हात साफ केले जात आहेत. दोन आठवड्यांत दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com