दिघंचीत सराफी दुकानात अठरा लाखांची चोरी; भिंतीला भगदाड पाडून दागिने लांबवले 

Theft of Rs 18 lakh in Dighanchi goldsmith shop; The wall was cracked and the ornaments stollen
Theft of Rs 18 lakh in Dighanchi goldsmith shop; The wall was cracked and the ornaments stollen
Updated on

दिघंची (जि. सांगली ) : आटपाडी तालुक्‍यातील दिघंची येथे राजेवाडी चौकात व ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्‍समध्ये असलेले बाबू हनुमंत जगताप यांचे सोन्या-चांदीचे दुकान चोरट्यांनी फोडले. भिंतीला भगदाड पडून 25 तोळे सोने व 15 किलो चांदी असे सुमारे 18 लाख रुपयांचा ऐवज चोरला. सोमवारी (ता. 9) सकाळी 7 वाजता हा प्रकार उघडकीस आला. 

दिघंची येथे राजेवाडी चौकानजीक महेश किराणा स्टोअर्सजवळ बाबू हनुमंत जगताप (रा. राजेवाडी) यांचे आदिती ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी सायंकाळी सात वाजता दुकान बंद करतेवेळी त्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे मौल्यवान साहित्य त्यांनी तिजोरीत भरले होते. सोमवारी सकाळी 7 वाजता शेजारी असणारे महेश किराणा बाजारचे मालक महेश शेटे यांनी जगताप यांना या घटनेची माहिती दिली.

मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानात 90 हजारांची मोठी तिजोरी आहे. ती कटरने तोडून चोरट्यांनी दागिने लांबवले असल्याचे जगताप यांनी सांगितले. दीपावलीच्या पाश्वभूमीवर त्यांनी दुकानात नवा माल आणला होता. त्यावर चोरट्यानी डल्ला मारला. याच दुकानात दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. या घटनांनी दिघंची परिसरात खळबळ उडाली. 

चोरीच्या घटनेनंतर सकाळी श्वान पथकासह फिंगरप्रिंट तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे अधिक तपास करीत आहेत. 

पाठीमागील झुडपांचा फायदा 
ग्रामपंचायतीच्या ताब्यातील या संकुलात पाठीमागे काटेरी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्याचा फायदा चोरट्यांनी घेत, दुकाने फोडण्याचे सत्र सुरू केले आहे. या वास्तूच्या पाठीमागे तलाठी कार्यालय व जिल्हा परिषद शाळाही आहे. त्यामुणे या ठिकाणची झुडपे काढून स्वछता करणे गरजेचे आहे.  

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com