esakal | सांगलीत दोन बंगले चोरट्यांनी हातोहात फोडले
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत दोन बंगले चोरट्यांनी हातोहात फोडले

विश्रामबाग परिसरातील दोन बंद बंगले चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

सांगलीत दोन बंगले चोरट्यांनी हातोहात फोडले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : विश्रामबाग परिसरातील दोन बंद बंगले चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

स्वप्ननगरी आणि गोविंद आर्केट कॉलनी परिसरात ही चोरी झाली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, सांगलीच्या हार्ट ऑफ सिटीमध्ये ही घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पोलिसांनी माहिती दिली, की सोमनाथ अरूण तारापुरकर (वय 48) यांचे स्वप्ननगरीत प्लॉट क्रमांक 13 मध्ये घर आहे. गुरूवारी (ता.20) सायंकाळी पाचच्या सुमारास ते बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी पाळत ठेवून मध्यरात्री घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील एक लाखा 15 हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि पाच हजारांची रोकड असा एकुण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

श्री. तारापुरकर हे काल सकाळी साडेनऊच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचा कडीकोयंडा उचकटलेला दिसला. घरातील साहित्यह अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांना कळविले. 
त्याच कालावधीत जुना धामणी रस्ता परिसरातील खरे क्‍लबजवळ गोविंद अर्केट कॉलनीतही चोरी झाल्याचे समोर आले. त्याठिकाणी धनंजय भगवान घोळवे (वय 42) यांचे घर आहे.

बुधवारी (ता.19) रोजी ते परगावी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी मध्यरात्री घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चादींचे दागिने आणि रोख रक्कम असा 1 लाख 700 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. घोळवे हा काल सकाळी साडेसहाच्या सुमारास घरी आले. त्यावेळी त्यांना घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. चोरी झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ व श्‍वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. 

दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे चौकशी केली जात आहे. चोरीच्या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे.