...तर उदयनराजेंनाही विराेध राहणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

भाजप सोबत जाणाऱ्या सर्वांना आमचा विरोध असेल.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. त्यांनी प्रवेश केल्यास आगामी निवडणुकीत त्यांच्यासह त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजेंना आमचा विरोध राहिल, असे स्पष्ट मत इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 
पूरग्रस्तांच्या मदतीबाबत काेकाटे यांनी पत्रकार परिषदेत आपले विचार मांडले. त्यानंतर 
पुरोगामी विचारांचे म्हणून लोकसभा निवडणुकीत तुम्ही उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी राहिला. पण आता ते भाजपमध्ये चालले आहेत अशी चर्चा सुरु झाली. त्यामुळे तुमची भुमिका काय राहिल, या प्रश्‍नावर कोकाटे म्हणाले, मुळात उदयनराजे हे भाजपमध्ये जाणार नाहीत. गेलेच तर आमचा त्यांना विरोध राहिल. यापुढे भाजप सोबत जाणाऱ्या सर्वांना आमचा विरोध असेल. उदयनराजेंसह शिवेंद्रसिंहराजेंनाही आम्ही आगामी निवडणुकीत विरोध करू. लोकशाहीला सुरूंग लावणाऱ्या भाजपच्या पाठीशी आम्ही कदापी राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान शासनाने पूरग्रस्तांना मदत करताना एकरी पाच हजार रूपये देऊन पुरग्रस्तांची शासनाने टिंगल केली आहे. मुळात ही पुरपरिस्थिती मानवनिर्मित असून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे उदभवल्याचे नमूद केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Then we will oppose udayanraje bhonsle