विघ्नहर्त्यावरच विघ्न ः श्री क्षेत्र सिद्धटेक संकष्टी चतुर्थीलाही सुनासुने

There are no devotees of Sankhate Chaturthi at Siddhatek
There are no devotees of Sankhate Chaturthi at Siddhatek
Updated on

कर्जत: संकष्टी चतुर्थीला भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून जाणारा क्षेत्र सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात आज शुकशुकाट होता. या शतकातील प्रथमच अशी आपत्कालीन परिस्थिती ओढवल्याचे जुने जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोनाचे गणेशाच्या भक्तांवर विघ्न आल्याने ते त्याच्या दारात जात नाही. जणू यामुळे भक्तांचे विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्त्यावरच एकाकीपणाचे विघ्न आले आहे.

आज संकष्टी चतुर्थी होती. या दिवशी तालुक्यातील क्षेत्र सिद्धटेक येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भल्या पहाटे पासूनच ओघ सुरू असतो. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हनून प्रशासनाच्या वतीने अष्टविनायकपैकी एक असलेले येथील सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे.सदर मंदिर कुलूप बंद झाल्यावर श्रद्धेपोटी भाविक मंदिरात येऊन दरवाजासमोर नतमस्तक व्हायचे. मात्र सध्या कोरोनामुळे सिद्धिविनायक मंदिरासह परिसरात सन्नाटा पाहायला मिळाला.

चंद्रोदय आणि झुणका भाकरीचा बेत 
या ठिकाणी चतुर्थीला उपवास करीत भाविक मोठ्या संख्येने येतात. श्रद्धापूर्वक दर्शन घेत सिद्धिविनायकापुढे नतमस्तक होतात. चंद्रोदय झाल्यानंतर येथील भीमा नदीच्या तीरावर अवखळ वाहणाऱ्या आणि चंद्राच्या शीतल छायेत न्हाऊन निघणाऱ्या पाण्याच्या साक्षीने झुणका भाकरीवर ताव मारीत कुटुंबियांसह उपवास सोडला जायचा. मात्र तो ही परिसर निर्मनुष्य होता.
 

मंदिर व परिसरातील विविध विक्रेत्यावर संक्रांत 
नियमित दर्शनासाठी जरी कमी अधिक गर्दी असली तरी चतुर्थी व इतर सणांच्या वेळी भाविकांची येथे विक्रमी गर्दी होते. त्यावर येथील अनेकांचे प्रपंच उभे आहेत. मात्र, सध्या सर्वकाही बंद असल्याने विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com