शेवगावात डॉक्टरच नाहीत, इलाज करायचा कुठं

There are no doctors in Shegaon
There are no doctors in Shegaon
Updated on: 

शेवगाव : तालुक्‍यातील दोन्ही ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. खासगी दवाखान्यातील अनेक डॉक्‍टरांनी सेवा बंद केल्याने सरकारी दवाखान्यांकडे धाव घेणाऱ्या नागरिकांसाठी हे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील तीनही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. ता. 31 मार्चला एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सेवेचा राजीनामा दिला. परंतु वैद्यकीय अधीक्षकांच्या विनंतीने ते तात्पुरता कार्यभार पाहत आहेत. इतर पाच कर्मचारी अशी आठ पदे रिक्त आहेत.

कोरोनाच्या भीतीने वाढत्या रुग्णांबरोबरच प्रसूती, शवविच्छेदन, वैद्यकीय केसेस अशा नियमित सेवा पुरविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी अडचणी येत आहेत. त्यातच कोरोनामुळे अनेक खासगी डॉक्‍टरांनी सेवा बंद केली आहे. अशा स्थितीत अनेक आजारांचे रुग्ण सरकारी दवाखान्यांकडे धाव घेत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने आधीच अपुरे कर्मचारी आणि इतर पूरक सरकारी सेवांच्या व्यापाने तेथील कर्मचाऱ्यांवर ताण येऊन रुग्णांची हेळसांड सुरू आहे.

सध्या नेवासे येथील ग्रामीण रुग्णालयातून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेऊन येथील कारभाराचा डोलारा सांभाळत आहेत. बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात एक एप्रिलला एक वैद्यकीय अधिकारी हजर झाले आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीनेच येथे कामकाज सुरू आहे.

येथेही दोन वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकपद रिक्त आहे. तसेच इतर नऊ कर्मचारी अशी 12 पदे येथे रिक्त आहेत. तालुक्‍यात सहा आरोग्य केंद्रे असून, यात 11 वैद्यकीय अधिकारी, एक विस्ताराधिकारी, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, चार आरोग्य सहायिका, नऊ सहायक, 22 आरोग्यसेवक, 30 सेविका, 206 आशासेविका व काही कंत्राटी कर्मचारी आहेत. मात्र, तालुक्‍यातील आणखी 61 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case
Ped Water Shortage
Mumbai Bengaluru Special Train
TET Exemption Plea Rejected
Marathi News Esakal
www.esakal.com