अजूनही आहेत दिवस झाडं लावण्याचे...नर्सरी बहरलेल्या

नंदू गुरव 
Friday, 31 July 2020

माधवनगर(सांगली)-  कोरोना व लॉकडाऊनमध्ये घरात कोंडून घ्यायची वेळ आली असताना ज्यांच्या दारात चार फुलांची झाडं आहेत त्यांचा दिवस मात्र ताजातवाना आहे. दारासमोर चार फळाफुलांची झाडं असण्याचं महत्व आता लॉकडाऊनमध्ये लोकांना समजलंयय. अजूनही झाडं लावण्याचे दिवस आहेत. नर्सरीमधून रोपे घ्यायची लोकांची लगबग सुरु आहे. 

लॉकडाऊनमध्ये घरात बसून करायचं काय ? या प्रश्नाचं उत्तर "अंगणात, रिकाम्या जागेत, प्लॉटवर झाडं लावायच' असं चांगलं उत्तर मिळत आहे. सांगली ही मुळातच निसर्गानं बहरलेली आहे. प्रत्येकानं घरासमोर फळाफुलांची चार का होईना पण झाडं लावलीत. यंदाचा पावसाळा वृक्षारोपणाशिवाय जातो की काय असं वाटत असताना निसर्गप्रेमी नागरीकांनी हा वेळ घरासमोरची बाग फुलवण्यासाठी सत्कारणी लावला आहे. त्यामुळेच अजूनही नर्सरीत्तून फळे आणि फुलांच्या रोपांना मागणी वाढती आहे. अजूनही लोक नर्सरीमधून झाडं नेऊन लागवड करीत आहेत. नर्सरीही फळाफुलासह सुशोभिकरणाच्या झाडांनी बहल्या आहेत. हिरवीगार रोपं चांगलीच तयार झालीत. दरही स्थिर आहेत. कुंड्या, सेंद्रीय खत, माती यांनाही मागणी आहे. 

""लॉकडाऊनमुळे शहरात रोपविक्री करता येत नाही. नर्सरीमधून रोपं घ्यायला येतातच. हजारहूनही जास्त प्रकारची रोपे सांगली परिसरातील नर्सरीत उपलब्ध आहेत. फुलांसोबत लोकांचा कल आता फळझाडांची लागवड करण्याकडेही वाढला आहे. घरासमोर एक तरी फळझाड असावं असा ट्रेंड वाढला आहे.'' 

-सागर मोटे, सांगली

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are still days of planting trees . nursery blossoms