राज्य महामार्गावरील रस्त्याला कोणी वाली आहे का ?

Is there a guardian on the state highway?
Is there a guardian on the state highway?
Updated on

एरंडोली : राज्यमार्ग कामासाठी मुरूम वाहतूक मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांची पूर्णपणे दैना उडाली आहे. या रस्त्याला कोणी वाली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिघंची - हेरवाड राज्यमार्ग क्रमांक 153 च्या कामासाठी मिरज पूर्व भागातील खंडेराजुरी ते एरंडोली, बेडग ते एरंडोली, आरग ते एरंडोली या मार्गावर मुरुम व खडीची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. अवजड वाहनांचा वापर वाढल्याने रस्त्याच्या डांबरीकरणाला खड्डे पडलेत. 

खंडेराजुरी - एरंडोली मार्गावर बेदाणा हंगाम सुरू आहे. या रस्त्यावर उत्पादन मोठ्या प्रमाणात आहेत. डंपरच्या वाहतुकीमुळे उडणारी धूळ बेदाणा निर्मितीसाठी मोठी अडचण ठरत आहे. ही धूळ मोठ्या प्रमाणात वाळू घातलेल्या बेदाण्यांवर तसेच शेडवरील बेदाण्यावर ती पडत असल्याने बेदाण्याच्या दर्जाही खालावत आहे. 

या रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने नुकताच भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरच्या चाकाखालील खडी उडून दोघांना मार लागला होता. असे किरकोळ अपघात नेहमीचे झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात डंपर येत असल्याने धूळ उडत आहे. धुळीमुळे इतर वाहनधारकांना वाहने बाजूला घेऊन थांबावे लागत आहे. 

नाही मालकांचे लक्ष 
रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. मात्र आतापर्यंत एकही अधिकारी फिरकलेला नाही. गौडबंगाल काय ? असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. राज्य मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri tiger kingdom power struggle
Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Marathi News Esakal
www.esakal.com