अचानक आग लागून 'झायलो' जळून खाक 

अचानक आग लागून 'झायलो' जळून खाक 
Updated on

तळेगाव दिघे (जि.नगर): रस्त्याने चालेल्या महिंद्रा झायलो गाडीला अचानक आग लागली. आगीत झायलो जळून खाक झाली. गाडीतील दोघेजण मात्र बचावले. तळेगाव-लोणी रस्त्यावर वडझरी बुद्रुक (ता. संगमनेर) शिवारात शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

राहाता येथील विजय भागवत बनकर हे तळेगाव दिघे येथून लोणीच्या दिशेने त्यांच्या मालकीच्या झायलो गाडीतून (क्र. एमएच 16 क्यू 9935) चालले होते. चालक सतिश बाबुराव विदुर (रा. सावळी विहिर) हा गाडी चालवीत होता. वडझरी बुद्रुक शिवारात रस्त्यावर अचानक आग लागून झायलो गाडीने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखत विजय बनकर व सतिश विदुर गाडीतून बाहेर पडले, त्यामुळे ते बचावले. त्यानंतर आगीत झायलो जळून खाक झाली. 

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी गाडीची आग विझविण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. या घटनेत अंदाजे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती. झायलो गाडीला आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eight Students Cause Trouble On ST Bus Driver Conductor Stay Alert Emergency Door Incident Ends At Police Station
NGRI geophysical survey Maharashtra
Ara grapes variety Maharashtra farmers
‘Stree: Sangharsh Te Swarajya 2026’ special issue welcomed in Kundal.
Marathi News Esakal
www.esakal.com