महामार्गावर झाली  घसरगुंडी ः पहा कुठे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

घाटनांद्रे (सांगली) ः विजापूर - गुहागर राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असून या मार्गाने प्रवास करणे मुश्‍कीलीचे झाले आहे. कधी शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईचा प्रश्न, कधी स्टोन क्रशर विरोधी अंदोलन तर कधी लॉकडाऊन सारख्या विविध समस्यांच्या गर्तेत हा महामार्ग सापडल्याने रस्त्याचे काम अत्यंत मंद गतीने सुरु आहे. 

घाटनांद्रे ते नागज रखडलेला हा रस्ता अंदाजे पाच कि. मी. अंतराचा आहे. या रस्त्याची चिखलामुळे अक्षरशः घसरगुंडी तयार झाली आहे. या महामार्गावरुन प्रवास करणे तर सोडाच पण शेतकरी वर्गाला आपल्या शेतात जाणेही मुश्‍किल झाले आहे. गाडी या चिखलमय रस्त्यावर गेली की गाडीला बाहेर काढण्यासाठी दुसरी गाडी बोलवावी लागते.

पावसामुळे धोकादायक बनलेला हा रस्ता सध्या अपघाताला निमंत्रण ठरतो आहे. लहान मोठे अपघात होत आहेत. याबाबत संबंधित कॉन्ट्रॅक्‍टरकडे विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था खुपच वाईट झाली आहे. सर्वात पुरातन हा मार्ग असून त्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

रस्त्याची सध्याची अवस्था पाहाता पुर्वीचाच रस्ता बरा होता आशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्यातच आता पावसाळा आल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात दलदल, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकाना वाहन चालवणे मुश्‍कील झाले आहे. या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार ? अजून किती दिवस दलदलीचा त्रास सहन करावा लागणार? यावर कधी मार्ग निघणार असे प्रश्न वाहनचालक व ग्रामस्थांसमोर उभे आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There was a landslide on the highway: see where

Tags
टॉपिकस
Topic Tags: